Rashi Bhavishya 7 May 2026 In Marathi : उद्या ७ मे २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील पंचमी तिथी सकाळी १० वाजून १३ मिनिटांपर्यंत असणार आहे, त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. आज साध्य योग जुळून येईल असणार आणि पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५१ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजून ३६ पर्यंत असणार आहे. तर स्वामी कृपेने तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ७ मे २०२६ (Dainik Rashi Bhavishya 7 May 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी.
