मेष

आजचा दिवस सर्व कामांसाठी उत्तम आहे. जुन्या कामांचा पाठपुरावा करा. महादेव मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आजचा दिवस साधारण आहे. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – मोतिया

मिथुन

आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक आणि आर्थिक नियोजनासाठी शुभ आहे. पशुपक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – केशरी

कर्क

आजचा दिवस साधारण आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. छोट्या आजराकडे दुर्लक्ष करू नये. मारुती स्तोत्र पठण करावे.
आजचा रंग – तांबडा

सिंह

आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य दिवस आहे. सूर्योदयाला गायत्री मंत्र पाच वेळा म्हणून अर्घ्य द्यावे
आजचा रंग – नारंगी

कन्या

आजचा दिवस उत्तम आहे. राशीत असलेल्या गुरुबळाचा फायदा घ्यावा. गुरु महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पिवळा

तूळ

आजचा दिवस उत्तम आहे. शांततेने निर्णय घ्यावे. पुढील नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. संध्याकाळी रामरक्षेचा पाठ करावा.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आजचा दिवस साधारण आहे. महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करू नये. शनिदर्शन घ्यावे.
आजचा रंग – करडा

धनु

आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक स्थावर मालमत्तेचे नियोजन करावे. मारुती उपासना करावी.
आजचा रंग – तेजस्वी हलका पिवळा

मकर

आजचा दिवस साधारण आहे. फार मोठे निर्णय, देवाण-घेवाण आज करू नये. ओम श्री सरस्वतैयः नमः दिवसभरामध्ये या मंत्राचे नामस्मरण करावे.
आजचा रंग – राखाडी

कुंभ

आजचा दिवस साधारण आहे. लहानसहान आजरांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावा. सदगुरूचे चिंतन करावे.
आजचा रंग – केशरी

मीन

आजचा दिवस साधारण आहे. कुठलेही मोठे निर्णय एकट्याने घेऊ नये. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu