मेष

आज चंद्राचे भ्रमण वृषभ  राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. पशुपक्षांना अन्नदान करणे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. ओम क्लीं श्री नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. ओम अदभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडांच्या गाठीभेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. आनंदी वेळ जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायांमध्ये प्रगतीकारक वातावरण असेल. ओम श्री महालक्ष्मै नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावासायिकांना मोठ्या उलाढालीचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करणे.
आजचा रंग – केशरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. नोकरीमध्ये कामांचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. खर्च संभवतो. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – राखाडी

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील. ग्रामदैवतेचे स्मरण करणे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. दुर्गा कवचाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu