मेष

कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – निळा

Valentines Day 2025 : love Astrology
Love Astrology : व्हॅलेंटाईन डे ला सिंगल लोक होतील मिंगल, ‘या’ सहा राशीच्या लोकांना मिळेल खरं प्रेम
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Rahu Shukra Yuti 2025
१८ वर्षानंतर राहु-शुक्राची युती, या तीन राशींना मिळेल गडगंड श्रीमंती; सुरू होईल सुवर्णकाळ
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश

वृषभ

गणपती मंदिरामध्ये लाल, तांबडी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पिवळा

सिंह

कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

कन्या

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

ॐ श्रीं नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

मकर

ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

लक्ष्मी अष्टकांचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

कुलस्वामिनी मंदिरात पांढरी फुले, गजरा अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – पांढरा

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader