मेष

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी निगडित, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. दुर्गा कवचाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. आजचे गृहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य. ओम आदि गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – मरुन

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. ग्रामदैवतेचे स्मरण करणे.
आजच रंग – पिवळा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम. दिवस आनंदी जाईल. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. ओम श्री आदि गुरवे नमः जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. व्यवसाय नोकरीसाठी उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. कुलस्वामिनी स्त्रोत्र पठण करणे.
आजचा रंग – लाल

कन्या

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतरचा वेळ आनंदात जाईल. ग्रामदैवताचे स्मरण करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस करावे. ओम अदभ्यो नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित चांगली वार्ता समजेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. ओम श्री महालक्ष्मयै नमः हा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

धनु

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – क्रीम

मकर

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. मुलांशी निगडित किंवा धाकट्या भावाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम अदभ्यो नमः हा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची आज सुरुवात होऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. आनंदवार्ता समजेल. ओम क्लीं श्री नमः हा जप करावा.
आजचा रंग जांभळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष आणि संध्याकाळपासून वृषभ राशीत आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत, जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा करावा. पशुपक्षांना अन्नदान करावे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu