मेष

ॐ प्रबुध्दाय नमः. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –पांढरा

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

वृषभ

ॐ स्वस्वरुपाय नमः. मोठे आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ जगद्पालकाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
आजचा रंग –केशरी

कर्क

ॐ शांभवे नमः. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ ईश्वराय नमः. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नविन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग -मोरपंखी

कन्या

ॐ प्रजापतये नमः. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ॐ भार्गवाय नमः. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. कौटुंबीक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग -मोरपंखी

वृश्चिक

ॐ वरदायिने नमः. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ सोमाय नमः. मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग –हिरवा

मकर

ॐ चिदंबराय नमः. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांना आजचे ग्रहमान अनुकूल आहेत.
आजचा रंग –पोपटी

कुंभ

ॐ खगाय नमः. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग-जांभळा

मीन

ॐ दामोदराय नमः. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसुल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणुक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu