मेष

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – लाल

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. शिवमानस पूजा करावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आज हुताशनी पौर्णिमा आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. गणपती उपासना करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – आकाशी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. कालभैरव अष्टक सकाळी संध्याकाळी वाचावे.
आजचा रंग – लाल

सिंह

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस, धन स्थिती उत्तम राहील, छोट्या प्रवासाचे योग संभवतात. शिवमानस पूजेचे वाचन करावे.
आजचा रंग – लाल

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. महादेवाचे दर्शन घ्यावे. एकमूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – राखाडी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. ओम महालक्ष्मै नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

धनु

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आज हुताशनी पौर्णिमा आहे. व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आज हुताशनी पौर्णिमा आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. ओम सांभवेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आज हुताशनी पौर्णिमा आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. सकाळ आणि संध्याकाळ धूप लावून सहस्त्र नामाचा पाठ करावा.
आजचा रंग – नारंगी

मीन

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आज हुताशनी पौर्णिमा आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. महादेवाच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu