आजचं राशीभविष्य, सोमवार, २१ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : आर्थिक गुंतवणूक करण्याचा दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आज आपल्या महत्वाच्या कामांना गती येईल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. धार्मिक शुभ समारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल.
 2. वृषभ : आज आपल्याला मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. आपल्या इच्छा पूर्ण होतील. व्यावसायिक कामानिमित्त प्रवासयोग घडतील. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
 3. मिथुन : नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात. आज आपण घेतलेले निर्णय अचूक ठरतील. आपले मनोबल वाढणाऱ्या घटना घडतील. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.
 4. कर्क : व्यवसायात इतरांची मतं जरी पटली नाहीत तरी ऐकून घ्या, वादंग टाळा. आपली मतं सभोवतालच्या व्यक्तीवर लादू नका. हितशत्रूंच्या कारवायांना मोठ्य़ा युक्तीवादाने सामोरं जावं लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल.
 5. सिंह : परदेशातील नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत अधिकारयोग मिळतील. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्येग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल.
 6. कन्या : आपल्या कतृत्वाच्या जोरावर मित्रपरिवारात आपली मतं पटवून द्याल. आपली प्रशंसा होईल. आर्थिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील.
 7. तूळ : शैक्षणिक क्षेत्रात दिवस प्रगतीकारक आहे. छोटे प्रवासयोग घडतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अनिश्चितता जाणवेल.
 8. वृश्चिक : आज आपल्याघरी मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती येतील. घरी आलेल्या पाहुण्यांमुळे आपल्या जीवनात भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत वरिष्ठांना मान देऊन आपली कामे करा. आपल्या वाक्चातुर्याने दुसऱ्यांची मनं जिंकून ध्येयपूर्ती कराल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.
 9. धनु : आज नोकरीतील कामानिमित्त अचानक प्रवास योग संभवतात. संततीच्या नोकरीसंबंधी सुवार्ता कानी येईल. अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.
 10. मकर : आज आपल्याला अचानक धनलाभाचा योग आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आपली मतं डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.
 11. कुंभ : आजचा दिवस प्रवासयोगास अनुकूल आहे. नोकरीत बढतीचे योग संभवतात. कौटुंबिक कलह टाळावेत. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील.
 12. मीन : आपल्या संततीस नोकरीनिमित्त परदेशगमन होण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. व्यावसायिक घडामोडी काळजीपूर्वक करावा. त्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील.

  — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 21 december 2020 aau