मेष

संमिश्र लाभाचा दिवस आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. संध्याकाळी महादेवाचे दर्शन घेणे. पशुपक्षांना अन्नदान करणे.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

संमिश्र लाभाचा दिवस आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. कुलदैवतेचे स्मरण करुन दर्शन घ्यावे.
आजचा रंग- पांढरा

कर्क

संमिश्र लाभाचा दिवस आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतरचा वेळ आनंदात जाईल. ओम नमः शिवाय जप सुरू ठेवणे.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

संमिश्र लाभाचा दिवस आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. ओम सोमाय नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

कन्या

संमिश्र लाभाचा दिवस आहे. वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

संमिश्र लाभाचा दिवस आहे. धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पोपटी

धनु

संमिश्र लाभाचा दिवस. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – नारंगी

 

मकर

संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत आणि साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवणे.
आजचा रंग – राखाडी

मीन

संमिश्र लाभाचा दिवस. वादविवाद टाळावेत. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu