मेष

दुपारनंतर चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये येत आहे. हे भ्रमण मेष राशीला लाभदायक ठरणार आहे. महत्त्वाची कामे, शासकीय कामे याचा पाठपुरावा करावा. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

महत्त्वाच्या कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस अत्यंत शुभ आहे. गुरुजनांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्त्वाचे कामे सुरू करावीत. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आर्थिक धाडसांसाठी योग्य दिवस. भविष्यातील आर्थिक योजनांचे नियोजन करावे. विष्णू दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

कर्क

नोकरी व्यवसायामध्ये गुपिते कोणालाही सांगू नये. मित्र-मंडळी ओळखावीत. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

नोकरी व्यवसायातील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – पिवळा

कन्या

आठवड्याची सुरुवात सावधपूर्वक करावी. विनाकारण मतप्रदर्शन करू नये. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

तूळ

भावंडांच्या भेटीगाठीचे योग. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. ओम श्री लक्ष्मीयै नमः हा जप करणे.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

कुटुंबाची योग्य काळजी घ्याल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. ओम शामनवैय नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पिवळा

धनु

जुन्या ओळखीची लोक भेटतील. आनंदी दिवस कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – करडा

मकर

यशदायी दिवस. आर्थिक विवंचना सुटतील. कालभैरव दर्शन घेणे.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

योग्य नियोजन केल्यास यशदायी दिवस. आर्थिक लाभ होतील. ओम नमः शिवाय या नामाचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मीन

आठवड्याची सुरुवात पूर्ण नियोजनाने करावी. घाईघाईत निर्णय घेऊ नयेत. घरातून निघताना ओम नमः शिवाय जप करून निघावे.
आजचा रंग – हिरवा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu