मेष

संमिश्र लाभाचा दिवस आहे. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. भावंडाशी वाद वादविवाद टाळावेत. वरिष्ठांशी सलोखा राहील. घरातून निघताना ओम नमः शिवाय जप करुन निघावे.
आजचा रंग – लाल

वृषभ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कालभैरव दर्शन घेणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

सर्व प्रकारच्या लाभांसाठी उत्तम दिवस आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजन पूर्व दिवसांची आखणी करावी. वरिष्ठांशी मर्जी राखाल. वादविवाद टाळावेत. ओम श्री लक्ष्मीयै नमः हा जप करणे.
आजचा रंग- पांढरा

सिंह

सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. महामृत्यूंजय जप करावा.
आजचा रंग – सोनेरी

कन्या

नियोजन पूर्व दिवसाची आखणी करावी. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम राहील. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – पांढरा

तुळ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. नियोजन पूर्व दिवसांची आखणी करणे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग-  सोनेरी

वृश्चिक

संमिश्र लाभाचा दिवस आहे. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

धनु

संमिश्र लाभाचा दिवस आहे. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करावे. विनाकारण कर्ज घेऊ नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आज महादेवाच्या मंदिरात तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – लाल

कुंभ

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. गुरुजनांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्त्वाची कामे सुरू करावीत.
आजचा रंग – आकाशी

मीन

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu