मेष
गणपती व मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
शनि मारूती मंदिरात तीळ तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
ओम शनेवश्वराय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – लाल

सिंह
शनि मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडे आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकावर मात करू शकाल.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
पुरूष सुक्तांचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

तुळ
शनिला तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – फिकट पिवळा

वृश्चिक
ओमकार मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – नारंगी

धनु
शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्वाची कामे करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मकर
दत्त महाराजांच्या आणि शनि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
गुरूचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभंनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- निळा

मीन
गणपतीचे आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. लाल फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. मोठया जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे घेर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu