आजचे राशीभविष्य, शनिवार, २ सप्टेंबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
दत्ता महाराजांचे पांढरी फुले अर्पण करून दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- राखाडी

वृषभ
शनि मंदिरामध्ये दानधर्म करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- पांढरा

मिथुन
मारूती मंदिरामध्ये मारूती स्त्रोताचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पती, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग- नारंगी

कर्क
मारूती मंदिरात दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहाने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- हिरवा

सिंह
मारूती मंदिरात दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पोपटी

कन्या
शनि, मारूती मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिका आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहिल. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
शनी मंदिरामध्ये तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- गुलाबी

वृश्चिक
गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कम्युडिटी, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – गडद निळा

धनु
शनि, मारुतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात
आजचा रंग- निळा

मकर
दुर्गा कवच वाचावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे . महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ
श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे . सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहिल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग- पांढरा

मीन
रामरक्षेचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी- अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 2 september