- मेष:-
ज्येष्ठांशी समजुतीचे धोरण ठेवावे. गृहशांती जपावी. पोटाचे विकार संभवतात. चुकीच्या विचारांना प्रयत्नपूर्वक दूर सारा. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. - वृषभ:-
मुलांच्या वाढत्या करवायांकडे लक्ष द्या. मैदानी खेळ खेळाल. लहानसहान जखमांकडे वेळेवर लक्ष द्यावे. कामात चपळाई दिसून येईल. जुगारापासून दूर राहावे. - मिथुन:-
कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्याल. घरातील शांतता जपावी. नवीन जबाबदारी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. - कर्क:-
टीकेला सामोरी जावे लागू शकते. स्व:मतावर आग्रही राहाल. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करावा. मानसिक चंचलता जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल. - सिंह:-
खर्च वाढू शकतो. वाद-विवादात सहभाग घेऊ नका. आर्थिक बाबतीत सर्वतोपरी विचार करावा. आवडीचे तिखट पदार्थ खाल. सतत खटपट कराल. - कन्या:-
ध्येय गाठण्याचा पर्यंत करावा. कामात उत्साह जागृत ठेवाल. अधिकाराचा योग्य वापर करावा. आपला रुबाब दाखवाल. जोमाने कामे हाती घ्याल. - तूळ:-
सामाजिक वादात अडकू नका. गैरसमजुती पासून दूर राहा. कचेरीच्या कामात लक्ष घालाल. मोठ्या प्रवासात काळजी घ्यावी. पायाचे विकार संभवतात. - वृश्चिक:-
मनातील प्रबळ इच्छा जागृत ठेवाल. दिवसभर कामाची धावपळ राहील. व्यावसायिक लाभाकडे अधिक लक्ष द्याल. मैत्रीतील मतभेद बाजूस सारावेत. प्रयत्न कमी पडू देऊ नका. - धनु:-
अनपेक्षित बदलांकडे सकारात्मकतेने पहा. गृहशांती जपावी. स्त्री सहवासात रमाल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. वरचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करावा. - मकर:-
व्यवसायातील तांत्रिकता जाणून घ्या. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. सासरच्या मंडळीना खुश करावे. उपासनेला बळ मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी. - कुंभ:-
आरोग्याबाबत जागरूकता ठेवावी. गैरसमजाला बळी पडू नका. अपचनाचा त्रास जाणवेल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत सतर्कता ठेवा. - मीन:-
जोडीदाराला चटकन विरोध करू नका. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. जन-विरोधाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक सौख्य लाभेल. कामात एकसूत्रता ठेवा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 26-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 26 october 2019 aau