मेष

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी उत्तम ग्रहमान. वाहने जपून चालवावीत, कामांत उत्साह जाणवेल. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. हनुमान चालिसाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल, वरिष्ठांची अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन वाहनांचा योग, छोटे प्रवास घडू शकतात. नवीन संधी निर्माण होतील. त्याचा पाठपुरावा करावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मुलांचे कौतुक होईल. हनुमान चालिसाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सल्ला मसलत केल्याशिवाय घेऊ नये. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घेणे. उष्णतेचे विकार होऊ देऊ नये. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सल्ला मसलत केल्याशिवाय घेऊ नयेत. मारुती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे.
अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. मारुतीला शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. उलाढाली जपून कराव्यात. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. वरिष्ठांची मर्जी राहील त्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कालभैरव दर्शन घेणे.
आजचा रंग – निळा

तुळ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, गाठीभेटीसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. शनी मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. शनी मंदिरात तेल आणि शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – केशरी

धनु

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करणे. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम विश्वभ्यो देवेभ्यो नमः या मंत्राचा २१ वेळा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

मकर

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. ओम देवभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी आजचा दिवस चांगला आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. नवीन आर्थिक योजना राबविण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. व्यवसायात प्रगती कराल. मारुती मंदिरात स्त्रोत्र म्हणून दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज महत्त्वाचे निर्णय एकट्याने घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करावे.
आजचा रंग – पांढरा