मेष

आजचा दिवस सर्व कामांसाठी शुभ आहे. सर्व कामाच्या पाठपुराव्यासाठी नवीन कामाच्या योजनांसाठी शुभ दिवस आहे. गणपती मंदिरामध्ये तांबडे फुल अर्पण करावे.
आजचा रंग – हिरवा

वृषभ

आजचा दिवस साधारण आहे. नियोजनात राहावे. कमीत कमी अन्नसेवन करावे. लक्ष्मीमंत्राचे पठण करावे.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

आजचा दिवस शुभ आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने योग्य दिवस आहे. दुपारी एकनंतर महत्त्वाची कामे करावीत. पशु पक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – पिवळा

कर्क

आजचा दिवस शुभ आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी योग्य दिवस आहे. शनी मंदिरामध्ये डाळीच्या पदार्थांचे दान करावे.
आजचा रंग – निळा

सिंह

रोजच्या दिनचर्येतील साधारण दिवस. महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पोषक ग्रहदशा नाही. सूर्यदर्शन घेणे आणि मारुतीला तीळ तेलाचा दिवा लावणे.
आजचा रंग – लाल

कन्या

आनंदी दिवस. गणपतीचे पूजन करावे.
आजचा रंग – लाल

तूळ

कौटुंबिक सौख्य लाभेल. छोट्या सहलीचे योग येतील. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

भावडांच्या भेटीचा योग. आनंदी दिवस. गणपतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी

धनु

अनपेक्षित लाभाचे योग. शनी मारुती मंदिरामध्ये दिवा लावावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

यशदायी दिवस. आनंदी वार्ता समजेल. कुलदैवतेचे आणि सदगुरुचे नामस्मरण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वादविवाद टाळावेत. रामरक्षेचे पाठ करावेत.
आजचा रंग – तपकिरी

मीन

जुने मित्र भेटण्याची शक्यता. आर्थिक नियोजन सुधारेल. मारुतीचे दर्शन घेणे.
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu