आजचे राशीभविष्य, रविवार, १९ मार्च २०१७ | Loksatta

आजचे राशीभविष्य, रविवार, १९ मार्च २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य, रविवार, १९ मार्च २०१७
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. गुरू वंदन करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पिवळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितासाठी चांगला दिवस आहे. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महादेव मंदिरामध्ये एकमूठ तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग- तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. कुलदैवतेचे स्मरण करुन दिवस आनंदात घालवावा.
आजचे रंग – निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- गुलाबी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. कुलदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – लाल

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ग्रामदैवतेची पूजा करावी.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. आज कुलदैवतेचे मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस उत्तम आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. कुलदैवतेचे स्मरण करावे. दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. आज कुलस्वामिनीचे दर्शन करावे.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2017 at 01:30 IST
Next Story
आजचे राशीभविष्य, शनिवार, १८ मार्च २०१७Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य