मेष

आज मकर राशीतील चंद्राचे भ्रमण मेष राशीला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. ओम नमः शिवाय मंत्राचा जप दिवसभरात तिन्ही प्रहरात करावा.
आजचा रंग – करडा

वृषभ

मकरेचा चंद्र वृषभेला लाभदायक आहे. जुन्या अनेक गोष्टींना उजाळा मिळेल. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. महत्त्वाच्या निर्णयांत कायदेशीर सल्ला घ्यावा. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तांबडा

कर्क

व्यवसायाच्या, नोकरीच्या नियोजनासाठी योग्य दिवस. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

सिंह

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. ज्येष्ठांशी वाद वाढवू नयेत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कन्या

शुभ दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

तूळ

प्रसन्न दिवस. कौटुंबिक रुसवे फुगवे दूर करता येतील. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

जुन्या मित्रांच्या भेटीचा योग. व्यवसायांशी निगडीत शुभवार्ता. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

धनु

सौख्याचा आणि आनंदी दिवस. प्रवासाचे योग. ग्रामदैवताचे दर्शन घ्यावे, दान करावे.
आजचा रंग – निळा

मकर

छोट्या प्रवासाचे योग. दिवस आनंदात घालवाल. गणपतीचे स्मरण करावे.
आजचा रंग – निळा

कुंभ

प्रकृतीची काळजी घ्यावी. मोठे प्रवास टाळावेत. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

मीन

प्रवासाचे योग. नातेवाईकांना वेळ देऊ शकाल. ओम आदित्याय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu