आजचे राशीभविष्य, रविवार, ७ मे २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
आज देवाला दूध भाताचा नैवेद्य दाखवून कामाची सुरूवात करावी. कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वाद विवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – लाल

वृषभ
ओम द्रा गुरवे नम: या नामाचा जप करणे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – आकाशी

मिथुन
ओम आदित्याय नम: या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क
पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

सिंह
कालभैरवांचे दर्शन घ्यावे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – हिरवा

कन्या
ओम श्री आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम दिवस. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पांढरा

तुळ
पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर, शेअरशी निगडीत मंडळीनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – हिरवा

वृश्चिक
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग
आजचा रंग – निळा

धनु
कुलदैवताचे पूजन करावे. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पांढरा

मकर
महादेवाचे दर्शन घ्यावे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – लाल

कुंभ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. प्रवास जपून करावा. आर्थिक निर्णय घेताना सल्ला-मसलत करावा. सहकाऱ्याशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – आकाशी

मीन
काल भैरवाचे दर्शन घ्यावे. दानधर्म करावा. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 7 may

ताज्या बातम्या