scorecardresearch

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २२ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रमंडळींच्या सहवासात रमाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करावा. रागाला आवर घालावा.
 • वृषभ:-
  भावंडांच्या सहवासात खुश असाल. आवडते साहित्य वाचायला मिळेल. छोटा प्रवास मजेत होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.
 • मिथुन:-
  गायन कलेची आवड जोपासाल. अधिकारवाणीने बोलाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. तुमच्यातील उर्जेचा योग्य वापर करावा. नवीन अधिकारांचा वापर कराल.
 • कर्क:-
  उत्कृष्ठ तर्कपद्धती वापराल. जास्त चिकित्सा करू नका. आपले मत योग्यरीतीने मांडाल. भावनेच्या आहारी जावू नका. मित्रांच्या रागाला सामोरे जावे लागेल.
 • सिंह:-
  हेकेखोरपणा करू नका. कामातील अडथळे दूर करावेत. पित्ताचा त्रास जाणवेल. चिडचिड करू नका. वादात अडकू नका.
 • कन्या:-
  लहान मुलांशी मैत्री कराल. गप्पांमधून जवळीक वाढवाल. पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
 • तुळ:-
  जोडीदाराचे प्रभुत्व राहील. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.
 • वृश्चिक:-
  तुमच्या बोलण्यावर इतर खुश होतील. धोरणीपणाने वागाल. निसर्गरम्य वातावरणात रमाल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल.
 • धनु:-
  कफविकाराचा त्रास जाणवेल. अतिविचार करू नयेत. तुमच्या अनुमानाला निश्चिती येईल. रेस, जुगार यांतून फायदा संभवतो. करमणुकीच्या कार्यक्रमात रमाल.
 • मकर:-
  पत्नीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक कराल. व्यवहारकुशलता दर्शवाल. कामाचा ताणामुळे दुरावा वाढवू शकतो. घरातील वातावरणात रमून जाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
 • कुंभ:-
  विश्वासास पात्र व्हावे. खोट्याचा आधार घेवू नका. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. कामाची धावपळ राहील. मनाची संवेदनशीलता दाखवाल.
 • मीन:-
  कौटुंबिक प्रभुत्व दाखवाल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 22 august 2019 aau

ताज्या बातम्या