मेष

संमिश्र लाभाचा दिवस आहे. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. भावंडाशी वाद वादविवाद टाळावेत. वरिष्ठांशी सलोखा राहील. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. मारुती स्त्रोत्र म्हणणे.
आजचा रंग – लाल

वृषभ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

सर्व प्रकारच्या लाभांसाठी उत्तम दिवस आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजन पूर्व दिवसांची आखणी करावी. वरिष्ठांशी मर्जी राखाल. वादविवाद टाळावेत. ओम श्री क्लीम भगवतैय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- पांढरा

सिंह

सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

कन्या

नियोजन पूर्व दिवसाची आखणी करावी. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम राहील. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. लक्ष्मी दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

तुळ

संमिश्र लाभाचा दिवस आहे. नियोजन पूर्व दिवसांची आखणी करणे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेणे.
आजचा रंग- हिरवा

वृश्चिक

संमिश्र लाभाचा दिवस आहे. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

धनु

संमिश्र लाभाचा दिवस आहे. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. गणपती स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करावे. विनाकारण कर्ज घेऊ नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत्र पठण करणे.
आजचा रंग – लाल

कुंभ

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. कुलदैवतेचे स्मरण आणि दर्शन करावे.
आजचा रंग – आकाशी

मीन

संमिश्र लाभाचा दिवस. त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसाची आखणी करावी. मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. कुलस्वामिनीचे चिंतन करावे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu