- मेष:-
मानसिक थकवा जाणवू शकतो. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होण्याचे कारण नाही. घरातील वडील व्यक्तींचा तुम्हाला विरोध होऊ शकतो. आपली बाजू योग्यप्रकारे मांडावी. प्रवास करावा लागेल. - वृषभ:-
हातातील कामात यश येईल. तुमचा दर्जा वाढेल. विरोधातील व्यक्ती शांत राहतील. छुप्या शत्रूंवर विजय मिळविता येईल. कामातून चांगली धनप्राप्ती होईल. - मिथुन:-
मुलांशी मतभेद संभवतात. कामाचा ताण वाढू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येईल. चोरांपासून सावध राहावे. छुपेशत्रू त्रासदायक ठरू शकतात. - कर्क:-
नातेवाईकांचे प्रश्न त्रासदायक ठरतील. मनातील निरुत्साह काढून टाकावा. कौटुंबिक अडचण सोडवाल. मित्रांशी सुयोग्य संवाद साधावा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. - सिंह:-
हातात नवीन अधिकार येतील. तुमचा दर्जा सुधारेल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमचे धैर्य वाढीस लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. - कन्या:-
फसवणुकीपासून सावधानता बाळगावी. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मत्सराला बळी पडू नका. सहकाऱ्यांशी सामोपचाराने वागावे. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. - तूळ:-
रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. कोणाशीही उघड शत्रुत्व पत्करू नका. किरकोळ जखमांवर वेळीच उपाय करावा. अडचणींवर मात करावी. - वृश्चिक:-
पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेरील असतील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. गुप्तशत्रूंवर विजय मिळवाल. - धनु:-
घेतलेल्या कामाचे योग्य फळ मिळेल. मित्रमंडळींशी असणारे संबंध जपावेत. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. चंचलतेवर मात करावी. - मकर:-
अचानक सामोरी येणारी प्रकरणे सोडवावी लागतील. तुमचा विरोध केला जाऊ शकतो. सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कामातील विलंब टाकण्याचा प्रयत्न करा. सर्वांना आनंदी ठेण्याचा प्रयत्न कराल. - कुंभ:-
कामात चलबीचलता आणू नका. कौटुंबिक सौख्याचा विचार प्रथम करावा. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. मानसिक पिछेहाट टाळावी. सामाजिक संबंध सुधारतील. - मीन:-
वादाचे प्रसंग टाळा. दिरंगाईतून योग्य मार्ग काढाल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. परोपकाराची जाणीव ठेवावी. पत्नीच्या सहवासात रमाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 25-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 25 december 2019 aau