Dainik Rashi Bhavishya 10 September 2026 In Marathi : आज १० सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी असणार आहे. आज मघा नक्षत्र जागृत होईल आणि सिद्धी योग जुळून येणार आहे. राहू काळ १ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४९ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या कसा असणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ (Today Horoscope 8 September 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधि मिळेल. नवीन ओळख होईल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.
