Rashi Bhavishya 12 February 2026 In Marathi : आज ११ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर हर्षल योग जुळून येईल आणि जेष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. गुरुवारी १२ राशींवर स्वामीकृपा कशी राहील जाणून घ्या…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १२ फेब्रुवारी २०२६ (Dainik Rashi Bhavishya12 February 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

चंचलतेवर मात करावी. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

मानसिक चांचल्य जाणवेल. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

अतिविचार करणे टाळावे लागेल. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. नसते साहस करतांना सारासार विचार करावा.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

तुमचा कामातील जोम वाढेल. आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

शांत व गंभीर विचार मांडाल. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर