Aajche Rashi Bhavishya 30 August 2026 In Marathi : आज ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत होईल आणि शूल योग जुळून येणार आहे. राहू काळ ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वजवून ५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. मेष ते मीनचा रविवार कसा जाणार चला जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 August 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. घरगुती कामे मनाजोगी पार पडतील. पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आपल्या वागण्या बोलण्यात मृदुता दिसून येईल. थोडे कमी बोलण्यावर भर द्या. मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. निर्भीडपणे कार्यरत राहावे. कामातून मिळणार्‍या फळाकडे फार महत्त्व देऊ नका.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

मानसिक स्थैर्य बाळगा. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल. नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. चूक मान्य करावी. नात्यातील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. भौतिक सुखावर खर्च कराल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

बक्षि‍सास पात्र व्हाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे समाधानकारक रित्या पार पडतील. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढीस लागेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील. ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

आपलाच विचार पारखून घ्यावा. जोडीदाराचा विचार जाणून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्साही राहतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. एखादी नवीन ओळख होईल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

मनाची चंचलता काबूत ठेवा. तुमचा सल्ला विचारात जाईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. गुंतवणूक करताना सारासार विचार करा.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

गूढ विचारात रमून जाल. मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. उगाचच विरोध दर्शवू नका.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

घरातील कामे आवडीने कराल. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवाल. हातातील अधिकारात वाढ होईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. भागीदारीत समाधानी राहाल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

बरेच दिवस वाट पाहत असलेल्या उत्तराची प्रतीक्षा संपेल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. जबाबदारी वाढण्याची शक्यता. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल. संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर