Aajche Rashi Bhavishya 31 July 2026 In Marathi : आज ३१ जुलै २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील द्वितीया तिथी असणार आहे. आज धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल आणि सौभाग्य योग जुळून येईल. राहू काळ २ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर जुलै महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३१ जुलै २०२६ (Dainik Rashi Bhavishya 31 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

दिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

मोहाला बळी पडू नका. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

आज आशादायक ग्रहमान राहील. कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

दिवस प्रसन्नतेत उगवेल. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

व्यायामात आळस करू नका. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

नवीन संकल्पना कृतीत उतरवा. कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर