Daily Horoscope 4 october 2026 In Marathi : आज ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. आज परीघ योग आणि पुनर्वसु नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ४ वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून ४ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. रविवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 4 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.
