Daily Horoscope 5 March 2026 In Marathi : आज ५ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. त्याचबरोबर शूल योग जुळून येईल आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा गुरुवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ५ मार्च २०२६ (Horoscope Today 1 March 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

घरातील कुरबुरी समजून घ्या. जि‍भेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील. अति विचार करू नये.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

जोडीदाराचे विचार जाणून घ्याल. उघडपणे बोलणे टाळाल. कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे. कामाचा आनंद मिळेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल. जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

तुमची उत्तम छाप पडेल. गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्रा मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

आततायीपणा करू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

चौकसपणे विचार कराल. मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

कामाचा व्याप लक्षात घ्यावा. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर