Aajche Rashi Bhavishya 6 September 2026 In Marathi : आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. आज आर्द्रा नक्षत्र जागृत होईल आणि सिद्धी योग जुळून येणार आहे. राहू काळ ५ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमचा सुट्टीचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२६ (Horoscope Today 6 September 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जोडीदारामुळे भाग्योदय होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
