Daily Horoscope 7 April 2026 In Marathi : आज ७ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील पंचमी तिथी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. त्याचबरोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग जुळून येईल आणि रात्री २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत जेष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. मंगळवार तुमच्या राशीसाठी कसा असणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ७ एप्रिल २०२६ (Horoscope Today 7 April 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण अजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अती घाई उपयोगाची नाही.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.
