Aajche Rashi Bhavishya 8 July 2026 In Marathi : आज ८ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील अष्टमी तिथी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल आणि मग नवमी तिथी सुरु होईल. आज रेवती नक्षत्र संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जुळून येईल, त्याचबरोबर अतिगंड योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. राहू काळ ११ वाजून ५ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून १७ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. बुधवारी मेष ते मीनच्या आयुष्यात काय घडणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ८ जुलै २०२६ ( Rashi Bhavishya 8 July 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल. गायन कलेला वेळ द्यावा.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा. घाला.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
समोरच्या व्यक्तिला गृहीत धरू नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
सकारात्मक उर्जेने काम करावे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
मनातील विचारांनी गांगरून जाऊ नका. उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. कमी श्रमातून मिळणार्या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्या कोणाला घेऊ देऊ नका.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
अडचणींवर हसत-हसत मात करावी. केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. तिखट व तामसी पदार्थ खाल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल.
