Aries To Pisces Horoscope Today in Marathi : आज, ३० ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी बुधवारी दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. तर सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत वैधृती योग राहील. बुधवारी हस्त नक्षत्र रात्री ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आजचा राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल. याशिवाय ३० ऑक्टोबरला हनुमान जयंती आणि मासिक शिवरात्रीही साजरी करण्यात येणार आहे. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींचा कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

३० ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- घरगुती वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची मनधरणी करावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल.

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य

वृषभ:- कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा. राजकीय पाठिंबा मिळेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या. मित्रांशी बोलताना काळजी घ्या.

मिथुन:- मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. नवीन योजनांविषयी गौप्यता पाळा.

कर्क:- आज धनवृद्धी होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल. सहकारी वर्ग त्रासदायक ठरू शकतो. मैत्रीत वितुष्ट येऊ शकते.

सिंह:- आज तुमचा प्रभाव पडेल. दिवस उत्साहात जाईल. कौटुंबिक सन्मानात वाढ होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

कन्या:- व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी राहतील. अडचणीतून मार्ग काढता येईल. जमिनी संबंधी काम पार पडेल.

तूळ:- नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक:- कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. चोरांपासून सावध राहावे. नोकरीच्या ठिकाणी आपली आब राखून वागाल.

धनू:- आर्थिक कामात यश मिळेल. बोलण्यात सौम्यता बाळगाल. आरोग्याची काळजी घ्या. कर्ज देणे टाळावे. मित्रांसोबत वेळ घालवाल. बाहेरील खाणे टाळावे.

मकर:- सकारात्मक दृष्टीने व्यवसाय करावा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यानी संयम बाळगावा. नवीन कामात सध्या हात घालू नका. भावंडांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:- तरुणांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आज भाग्याची साथ मिळेल.

मीन:- प्रतिष्ठेत वाढ होईल. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत उदासीन राहू नका.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )