Dainik Rashi Bhavishya In Marathi , 10 May 2025: १० मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी आहे. त्रयोदशी दुपारी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत राहील. आज चित्रा नक्षत्र आणि सिद्धी योगाचा योगायोग असेल. सिद्धी योग दुपारी ४ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत रवी योग जुळून येईल. रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा शनिवार कसा जाणार जाणून घेऊया…
१० मे पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi, 10 May 2025)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)
आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.