Rashi Bhavishya 14 August 2026 In Marathi : आज १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. रात्री ३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जागृत होईल आणि सकाळी ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत परिघ योग आणि त्यानंतर शिव योग जुळून येणार आहे. राहू काळ २ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरु होईल ते १ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. आजच्या दिवशी तुमच्या बरोबर काय घडणार, तुम्हाला कसं वागावं लागणार त्याबद्दल जाणून घेऊ.

आजचे पंचांग व राशिभविष्य, १४ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 14 August 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

आवडी-निवडी वर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर