Daily Horoscope 19 August 2026 In Marathi : आज १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या विशाखा नक्षत्र जागृत होईल आणि ब्रम्ह योग जुळून येणार आहे. राहू काळ १२ वाजून २५ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त ११ वाजून ५८ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत राहील. तुमच्या राशीसाठी बुधवार कसा असणार जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, १९ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 19 August 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

निरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर