Rashi Bhavishya 19 July 2026 In Marathi : आज १९ जुलै २०२६ रोजी कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यातील षष्ठी तिथी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सुरु होणार आहे. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर परीघ योग जुळून येत आहेत. राहू काळ १० वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ११ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज चंद्राचे कन्या राशीत गोचर होणार आहे. आज सूर्यदेवाची कृपा तुमच्या राशीवर कशी राहणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १९ जुलै २०२६ (Dainik Rashi Bhavishya 19 July 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
धरसोड वृत्ती टाळावी लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्यावी. मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
इतरांचा विश्वास संपादन कराल. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक वातावरणात रमाल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वासठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा.
