Daily Horoscope 22 July 2026 In Marathi : आज २२ जुलै २०२६ रोजी कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यातील नवमी तिथी आहे. आज स्वाती नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर साध्य योग जुळून येईल. राहू काळ १२ वाजून २७ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्यासाठी बुधवार कसा असणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २२ जुलै २०२६ (Today Horoscope 22 July 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्वच्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.
