Aajche Rashi Bhavishya 3 April 2026 In Marathi : आज ३ एप्रिल २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. त्याचबरोबर वाघ्यात आणि हर्षण योग जुळून येईल आणि चित्रा आणि स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १० वाजता सुरु होईल ते १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमचा शुक्रवार कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ३ एप्रिल २०२६ (Today Horoscope 3 April 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. धार्मिक कामात मदत कराल. मानसिक तान वाढू शकतो. त्यागाचे महत्त्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

काही कामे सहजगत्या पार पडतील. कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. लोक तुमच्यावर खुश होतील. अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्या.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल. वेळेवर कामे पूर्ण करावीत. साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल. भागीदाराशी मतभेद संभवतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून त्रास संभवतो. उष्णतेचे त्रास संभवतात.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल. उधळेपणा करू नका.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. घरासंबंधीचे प्रश्न सोडवावेत. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

तुमच्यातील हिम्मत वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी सोडू नका. नातेवाईकांच्या कुरबुरी वाढू शकतात.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

आवश्यकता असेल तरच खरेदी करा. मानसिक व्यग्रता जाणवेल. औद्योगिक वाढीकडे लक्ष द्यावे. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. मागचा पुढचा नीट विचार करावा.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

कामातील अडचणी दूर करव्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. स्वभावात हट्टीपणा येईल. उत्साहाने कामे करावीत.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे सामोरी येऊ शकतात. आर्थिक बाबीची चिंता सतावेल. वादविवादात लक्ष घालू नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मौल्यवान वस्तु खरेदी कराल. कष्टाला पर्याय नाही. बौद्धिक डावपेच खेळाल. चातुर्याने कामे मिळवाल. कामाचा थकवा जाणवेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर