Rashi Bhavishya 30 July 2026 In Marathi : आज ३० जुलै २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील प्रतिपदा तिथी असणार आहे. आज श्रवण नक्षत्र जागृत असेल आणि आयुष्यमान योग जुळून येईल. राहू काळ २ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमचा गुरुवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २९ जुलै २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर