Today Horoscope 4 August 2026 In Marathi : आज ४ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील षष्ठी तिथी रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १ मिनिटांनी रेवती नक्षत्र जागृत असेल आणि रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी धृती योग जुळून येईल. राहू काळ ३ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त ३ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्यासाठी मंगळवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १ ऑगस्ट २०२६ (Aajche Rashi Bhavishya 4 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
अविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. काही बदल त्रस्त करू शकतात. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही. विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल. आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
सामाजिक बांधीलकी जपा. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन अनुभावातून शिकाल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्यावर विसंबून राहू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. भावनिक घटना घडू शकतात.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
घरगुती वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. कामाचा ताण जाणवू शकतो.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत. मेहनतीला पर्याय नाही.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या सहवासात रमाल. मनातील गैरसमज दूर होतील. आवडता छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. अति शिस्तीचा बडगा करू नका.
