Aajche Rashi Bhavishya 6 April 2026 In Marathi : आज ६ एप्रिल २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे . त्याचबरोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल आणि रात्री २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीला नवीन आठवड्याच्या पहिला दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ एप्रिल २०२६ (Rashi Bhavishya 6 April 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा. आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. झोपेची तक्रार जाणवेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
छोट्याश्या सुखाने सुद्धा खुश व्हाल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
कलाकारांना अनुकूलता लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कमिशनकडे लक्ष ठेवावे लागेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. अनुभवाचा वापर करता येईल. योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
प्रवास सावधगिरीने करावा. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत कराल. कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
दिवसभर कामात गढून जाल. आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
नसती काळजी करू नये. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. घरात टापटीप ठेवाल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष घालावे. घरगुती कामे उत्तमरीत्या पार पाडाल.
