Rashi Bhavishya 8 August 2026 In Marathi : आज ८ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील दशमी तिथी दुपारी २ पर्यंत असणार आहे. सकाळी ९ वाजून २ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल आणि संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तर संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वाजून ०८ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त सकाळी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिवारी तुमच्या राशीसाठी दिवस कसा असणार चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ७ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 8 August 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केन्द्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अति उत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतु साध्य होईल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर