Daily Horoscope 9 February 2026 In Marathi : आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर शोभन योग जुळून येईल आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजता सुरु होईल ते ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीची आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ९ फेब्रुवारी २०२६ (Horoscope Today 9 February 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जिभेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.

