Mesh To Meen Horoscope in Marathi, 5 June 2025 : ५ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रात्री २ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल, त्यानंतर व्यतिपात योग जुळून येईल. सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज गुरुवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया…
५ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Daily Horoscope In Marathi, 5 June 2025 )
मेष आजचे राशिभविष्य (Today’s Aries Horoscope )
नसते साहस करायला जाऊ नका. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.
वृषभ आजचे राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope )
मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.
मिथुन आजचे राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope)
संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.
कर्क आजचे राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope)
कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.
सिंह आजचे राशिभविष्य (Today’s Leo Horoscope)
मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.
कन्या आजचे राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope)
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
तूळ आजचे राशिभविष्य (Today’s Libra Horoscope)
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope)
जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
धनू आजचे राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope)
इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.
मकर आजचे राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope)
नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
कुंभ आजचे राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope)
रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.
मीन आजचे राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope)
जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर