Aajche Rashi Bhavishya 9 April 2026 In Marathi : आज ९ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. त्याचबरोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत परीघ योग जुळून येईल आणि रात्री २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीचा गुरुवार कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ९ एप्रिल २०२६ (Rashi Bhavishya 9 April 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल. जमिनीच्या व्यवहारात अडकू नका.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
मानसिक स्थैर्य जपावे. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
छंद जोपासायला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील. घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.
