Rashi Bhavishya 4 january 2026 In Marathi : आज ४ जानेवारी २०२६ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येईल आणि शततारका नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ११ वाजता सुरु होईल ते १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत असेल. रविवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ जानेवारी २०२६ (Horoscope Today In Marathi 4 january 2026 )

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

चांगले गृहसौख्य लाभेल. मित्रमंडळींचा गोतावळा जमेल. गप्पांमध्ये दिवस मजेत जाईल. व्यावहारिक ज्ञान वापरण्याची योग्य संधी मिळेल. कामाची उत्तम पकड जमेल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

तुमच्या मताचा मान राखला जाईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. शाब्दिक चकमक टाळा.
प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम परीक्षण कराल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

कौटुंबिक खर्च वाढेल. आवक चांगली राहील.मौल्यवान वस्तू खरेदी कराल. अत्यंत लाघवी शब्द वापराल. आवडते पदार्थ चाखाल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. मनाची चंचलता जाणवेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पित्तविकार जाणवतील.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. झोपेची तक्रार जाणवू शकते. दिवस चैनीत घालवाल. कागदपत्रे जपून ठेवावीत.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

कामाच्या बाबतीत समाधानी असाल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मित्रांची मदत होईल. नवीन वाहन खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

व्यावसायिक लाभ चांगला होईल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. आर्थिक जम बसेल. कलेतून चांगला फायदा संभवतो. नवीन ओळखी होतील.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

तांत्रिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल. स्वकष्टावर भर द्यावा. कामातील दिरंगाई टाळावी. वरिष्ठांची
मर्जी राखावी. प्रवासात काळजी घ्यावी.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

चिकाटी सोडून चालणार नाही. मनावरची मरगळ झटकावी लागेल. हातातील कामावर अधिक भर द्यावा. अचानक धनलाभ होईल.गैरसमज टाळावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

जवळच्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यावी. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. प्रेमसौख्यात पुढाकार घ्यावा. भागीदारीतील जम नीट बसवावा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीची कामे निघतील. कौटुंबिक सौख्यात रमाल. हातातील कामे पूर्ण होतील.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

हट्टीपणा सोडवा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रेमसंबंध सुधारतील. तुमच्या मताला विरोध केला जावू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर