Shubh Muhurat to buy Gold on Vijayadashami 2022: दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला देशभरात साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाने वाईटावर चांगल्याच्या विजय मिळवला होता. त्यामुळे दसरा हा सण साजरा करण्यात येतो. यंदा ५ ऑक्टोबर रोजी दसरा (Dussehra) सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या सणाला विजयादशमी देखील म्हंटले जाते. हिंदू पंचागानुसार, दसरा किंवा विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा करण्यात येतो.

या सणाचा दिवस अत्यंत शुभ मानला गेल्याने या दिवशी लोक नवीन कपडे, दागिणे, वाहन, शस्त्र आणि नवीन वस्तुंची पुजा करतात. या दिवशी नवीन वस्तु खरेदी करण्याला विशेष महत्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशीच भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दसऱ्याची तारीख, वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

( हे ही वाचा: यंदाच्या भाऊबीजेला बुधग्रह बदलणार आपली राशी; ‘या’ लोकांचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा)

तारीख आणि शुभ वेळ

विजयादशमी (दसरा) – ५ ऑक्टोबर २०२२, बुधवार

दशमी तारीख सुरू होते – ४ ऑक्टोबर २०२२ दुपारी २.२० पर्यंत

दशमीची तारीख संपेल – ५ ऑक्टोबर २०२२ दुपारी १२ वाजेपर्यंत

श्रावण नक्षत्र सुरू होते – ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १०.५१ पर्यंत

श्रावण नक्षत्र संपेल – ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ०९.१५ पर्यंत

विजय मुहूर्त – ५ ऑक्टोबर दुपारी ०२.१३ ते ०२.५४ पर्यंत

अमृत काल – ५ ऑक्टोबर सकाळी ११.३३ ते दुपारी ०१.०२ पर्यंत

दुर्मुहूर्त – ५ ऑक्टोबर, सकाळी ११.५१ ते १२.३८ पर्यंत.

( हे ही वाचा: दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकवणार; मिळेल बक्कळ संपत्तीसह नशिबाची मजबूत साथ)

दसऱ्याचे महत्व

पौराणिक कथेनुसार दसरा साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत. पहिल्या कथेनुसार, अश्विन शुक्ल दशमीला श्रीरामाने रावणाचा वध करून लंका जिंकली होती. त्यामुळेच हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. दुसर्‍या कथेनुसार, माँ दुर्गाने राक्षस महिषासुराशी १० दिवस भयंकर युद्ध केले आणि त्यानंतर अश्विन शुक्ल दशमीला त्याचा वध केला. या दोन्ही घटना वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचं दर्शवतात. त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात आला.

सोने खरेदीचा शुभ मुहुर्त

सोने खरेदीचा मुहुर्त सकाळी ६ ते ९ या वेळेत तर दुपारी ११.४८ ते १२.१५ पर्यंत आहे. तसंच सायंकाळी ४.३० ते ६.०० पर्यंतचा आहे. या मुहुर्तावर सोने खरेदी केल्यास, त्याचे शुभ परिणाम मिळतात.