scorecardresearch

२९ डिसेंबर पर्यंत ‘या’ तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती

Rashi Parivartan 2022: डिसेंबरमध्ये सूर्य व शुक्राच्या गोचराने सर्वच राशींवर प्रभाव आढळून येईल मात्र तीन राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ असू शकतो.

२९ डिसेंबर पर्यंत ‘या’ तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती
२९ डिसेंबर पर्यंत 'या' तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती (फोटो: संग्रहित)

Rashi Parivartan 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाच्या जन्मकुंडलीत ग्रह, नक्षत्र व राशी परिवर्तनासह काही महत्त्वपूर्ण बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव प्रत्येकाच्या खाजगी व सामाजिक आयुष्यात दिसून येतो. जेव्हा नवग्रहांपैकी कोणताही ग्रह आपले स्थान बदलून इतर राशींमध्ये स्थिर होतो तेव्हा त्या संपूर्ण प्रक्रियेत राशींच्या भविष्य व वर्तमानात काही बदल घडून येतात. येत्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच २०२३ च्या उर्वरित टप्प्यात तीन राशींसाठी सोन्याहून पिवळा असा धनप्राप्ती योग तयार होत आहे. डिसेंबरमध्ये सूर्य व शुक्राच्या गोचराने सर्वच राशींवर प्रभाव आढळून येईल मात्र तीन राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ असू शकतो. याकाळात आपल्या अनपेक्षित धनप्राप्तीने श्रीमंती लाभण्याची शक्यता आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, येत्या ५ डिसेंबरला शुक्र धनु राशीत विराजमान होणार आहेत तर १६ डिसेंबरला सूर्य देवता सुद्धा धनु राशीत प्रवेश घेणार आहे. यानंतर २९ डिसेंबरला शुक्र ग्रह गोचर करून मकर राशीत प्रवेश घेणार आहे. याचा अर्थ असा की ५ डिसेंबर ते २८ डिसेंबर हा काळ शुक्र धनु राशीत प्रभावी असतील. याकाळात सूर्य व शुक्राच्या युतीने खालील तीन राशींना अपार धनसंपत्ती लाभण्याचे प्रबळ योग आहेत. या तीन राशी कोणत्या चला जाणून घेऊयात..

Rashi Parivartan 2022 December: मीन

मीन राशीत शुक्र देव तिसऱ्या व आठव्या स्थानाचे स्वामी आहेत तर सूर्य देव मीन राशीच्या प्रभाव कक्षेत दहाव्या स्थानी विराजमान होणार आहेत. अर्थातच सूर्य व शुक्राची युती मीन राशीसाठी लाभदायी ठरू शकते. विशेषतः नोकरदार मंडळींना कामाचे समाधान व पगारवाढीचे योग आहेत. ऑफिसमध्ये तुमच्या उत्तम कामगिरीसाठी बोनस किंवा बक्षीस देऊन गौरवण्यात येऊ शकते. तसेच या राशीच्या भाग्यात काहीसे बदलाचे योग आहेत, जर तुम्ही नवी नोकरी शोधत असाल तर हा काळ तुमच्या फायद्याचा ठरू शकतो .

हे ही वाचा<< लक्ष्मी माता स्वप्नात देते ‘हे’ संकेत! बक्कळ पैसे व दीर्घायुष्य प्राप्तीआधी दिसू शकतात ‘या’ गोष्टी

Grah Gochar December 2022: कुंभ

कुंभ रास ही शनिची सर्वात प्रिय रास म्हणून ओळखली जाते परिणामी या राशीवर अन्य ग्रहांचा अत्यंत अशुभ असा प्रभाव होण्याची शक्यता कमी असते. उलट सर्वच ग्रह संक्रमणाने कुंभ राशीच्या मंडळींना लाभाचे योग असतात. सूर्य व शुक्राच्या युतीने सुद्धा आपल्याला येत्या काळात कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या पालकांमुळे किंवा भावंडांमुळे आर्थिक लाभाचे योग आहेत. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढीस लागेल. तुमच्या आयुष्यात नवीन लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< ५ डिसेंबरपासून ‘या’ राशींच्या भाग्यात चमकणार ‘शुक्रा’चे चांदणे? नववर्षात अपार धनलाभाची संधी

December Gochar 2022: मकर

डिसेंबर महिन्यात मकर राशीसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. सूर्य व शुक्र गोचर करून मकर राशीत अनुक्रमे दहाव्या व बाराव्या स्थानी विराजमान होणार आहेत. कोणतेही नवे काम सुरु करण्यासाठी हा लाभदायक काळ असू शकतो. तुमच्या गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत. परदेशवारीसाठीही तुमच्या राशीत ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमचा व्यवसाय जर प्रवासाशी संबंधित असेल तर तुम्ही येत्या काळात अपार पैसे कमावू शकता.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:46 IST

संबंधित बातम्या