December 2022 Shukra Budh and Sun Transit Will Give These Zodiac Signs Can Get Lots of Money And New Jobs | Loksatta

२०२२ चा डिसेंबर ‘या’ राशींसाठी घेऊन येऊ शकतो श्रीमंती; पाहा तुमच्या नशिबात आहे का अपार धनलाभ व प्रगती?

Shukra, Budh And Sun Transit In December: राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे मात्र अशा ४ राशी आहेत ज्यांना अपार धनसंपत्ती व प्रगतीचे योग तयार होत आहेत

२०२२ चा डिसेंबर ‘या’ राशींसाठी घेऊन येऊ शकतो श्रीमंती; पाहा तुमच्या नशिबात आहे का अपार धनलाभ व प्रगती?
उत्तम धनलाभ व करिअरमध्ये प्रगतीचे योग असणाऱ्या राशी कोणत्या हे आपण जाणून घेऊयात..(फोटो: संग्रहित)

Shukra, Budh And Sun Transit In December: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याला काही ग्रह आपले स्थान बदलून इतर राशींमध्ये संक्रमण करतात ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सध्याच्या ग्रहांच्या स्थितीनुसार येत्या डिसेंबर महिन्यात तीन महत्त्वाचे ग्रह संक्रमण करणार आहेत. वैभवदाता शुक्र व बुद्धिदेवता बुद्ध यांचे डिसेंबरमध्ये दोन वेळा गोचर होणार आहे तर सूर्य देवताही एकदा आपल्या स्थानावरून मार्गीक्रमण करणार आहे. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे मात्र अशा ४ राशी आहेत ज्यांना अपार धनसंपत्ती व प्रगतीचे योग तयार होत आहेत. या महिन्यात उत्तम धनलाभ व करिअरमध्ये प्रगतीचे योग असणाऱ्या राशी कोणत्या हे आपण जाणून घेऊयात..

Graha Rashi Parivartan In December 2022: मेष

मेष राशीसाठी डिसेंबर महिना अत्यंत शुभ व फलदायी सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीत सूर्य देव गोचर करून कुंडलीत सर्वात शक्तिशाली स्थानी विराजमान होणार आहेत. यामुळेच आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग तयार होत आहेत. तुमच्यावर नव्याने जाबदार्या टाकण्यात येतील मात्र यातून तुमचा अनुभव दांडगा होईल तसेच आर्थिक मिळकताही वाढण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या जोडीदाराची विशेष साथ लाभेल चुकूनही वादात पडू नका, मानसिक ताण जितका टाळता येईल तितका बाजूला ठेवा.

Rashi Parivartan In December 2022: कर्क

डिसेंबर महिन्यात कर्क राशीच्या मंडळींसाठी श्रीमंतीचे योग तयार होत आहेत. आपल्याला सूर्य व चंद्राच्या युतीने धनलाभाची संधी मिळू शकते. जर आपण भौतिक सुखाच्या शोधात असाल तर तुम्हाला येत्या काळात अत्यंत लाभदायक ग्रहस्थिती लाभेल. या काळात आपण नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. पुढील महिन्याभरात आपला मान- सन्मान वाढीस लागेल, तुमच्या सहकर्मचाऱ्यानंकडून, बॉसकडून, जोडीदाराकडून प्रशंसा प्राप्त होऊ शकते.

Graha Gochar In December 2022: सिंह

सिंह राशीच्या मंडळींच्या भाग्यात डिसेंबर महिन्यात अनपेक्षित लाभाचे संकेत आहेत. माता लक्ष्मी तुमच्यावर वरदहस्त ठेवू शकते यामुळेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा मुख्य नोकरीसह केलेल्या अतिरिक्त व्यवसायातून धनप्राप्तीची संधी आहे. जर तुम्ही बहुराष्ट्रीय संस्थेत कार्यरत असाल तर तुम्हाला आर्थिक बाबीत प्रचंड यश लाभू शकते. तुमचा व्यवसायही वृद्धिंगत होण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा << २९ डिसेंबर पर्यंत ‘या’ तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती

3 Planets Transit In December 2022: तूळ

डिसेंबर महिन्यात तूळ राशीच्या मंडळींना अपार धनप्राप्ती होऊ शकते, तुमची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. तसेच तुमचे पैसे अडकले असल्यास पुनर्प्राप्तीचे योग आहेत. व्यवसायातून नफ्याच्या संधी आहेत, शुक्र हा वैभवदायक म्हणून ओळखला जातो यामुळेच आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. या महिन्यात कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 09:19 IST
Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २८ नोव्हेंबर २०२२