Ardhakedra yog: ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि शुक्र ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. शनी न्यायप्रिय असून तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तर शुक्र ग्रहाला भौतिक सुखाचा कारक ग्रह म्हटले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडली शुक्र शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान असून शुक्र मकर राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांबरोबर अर्धकेंद्र योग निर्माण करतील.

पंचांगानुसार, ५ डिसेंबर रोजी शुक्र आणि शनी संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल, हा योग खूप शुभ मानला जातो. यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल.

shani nakshatra gochar 2024
पुढचे ११७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Surya Gochar 2024 positive effect
सूर्याचा जबरदस्त प्रभाव! १४ जानेवारी २०२५ पर्यंत ‘या’ तीन राशींना होणार आकस्मिक धनलाभ
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश

शनी-शुक्र ‘या’ तीन राशींना देणार बक्कळ पैसा

मेष

मेष राशीत शुक्र दहाव्या घरात तर शनी अकराव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

अर्धकेंद्र योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: सूर्याचा जबरदस्त प्रभाव! १४ जानेवारी २०२५ पर्यंत ‘या’ तीन राशींना होणार आकस्मिक धनलाभ

मकर

मकर राशीच्या व्यक्तींवर शनी-शुक्र ग्रहाची विशेष कृपा होईल,ृ या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)